ग्रामपंचायत कार्यालय व नूतन जलकुंभाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा, रसलपूर
आज दिनांक 02 जानेवारी 2026 रोजी तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार श्री. अनिल अण्णा कदम साहेब यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालय तसेच जल जीवन मिशन योजनेंतर्गत नूतन जलकुंभाचे उद्घाटन माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. बाळासाहेब शिरसागर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मा. श्रीमती नम्रता जगताप मॅडम, गटविकास अधिकारी (ऊ. श्रे.), पंचायत समिती निफाड यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी श्री. प्रशांत बोरसे, श्री. राजेश थोरात (विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत), सूर्यवंशी साहेब (शाखा अभियंता), श्री. स्वप्निल कुंदे, श्री. सुनील शिंदे, श्री. शकील मन्सुरी (ग्रामपंचायत अधिकारी) तसेच पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख व विस्तार अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायतीतर्फे सौ. योगिता केशव सातभाई (सरपंच), मा. उपसरपंच सौ. मनिषा सचिन निकाळे तसेच सदस्य सौ. आशा गोरख पिठे, श्री. गोकुळ नारायण कुंदे, कु. गायत्री नानासो पवार, सौ. दुर्गा प्रशांत गोसावी, सौ. दिपाली मनोज पवार, श्री. लक्ष्मण रामभाऊ गांगुर्डे, श्री. शंकर सुभाष धोंगडे व ग्रामपंचायत कर्मचारी श्री. विनोद दिलीप निकाळे, श्री. एकनाथ दिगंबर सातभाई, श्री. राहुल शिंदे, श्री. भिका सुधाकर भंडारे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम ग्रामस्थ, कार्यकारिणी सदस्य व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय रसलपूर व जलकुंभाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.